Math Trick
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी गणितासारख्या विषयात कमी वेळात उत्तर काढणे खूप महत्वाचे असते. www.abhyaskatta.com या वेबसाईटवरील गणित टेस्ट क्र.5 मध्ये 41,45,44,42,43 यांची सरासरी किती ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.मित्रांनो सरासरी काढण्याची नेहमीची पद्धत सर्वाना माहीतच आहे.अशावेळी आपण या सर्व सख्यांची बेरीज करतो आणि आलेल्या बेरजेला एकूण संख्येने भागतो या ठिकाणी 6 संख्या आहे म्हणजे आलेल्या बेरजेला आपण 6 ने भागू आणि सरासरी काढू .या पद्धतीनेपण उत्तर बरोबर येईल.परंतु आज आपण अशा उदाहरणाच्या बाबतीत सरासरी काढण्याची एक सोपी ट्रिक बघणार आहोत. अगदी सेकंदात उत्तर काढता येईल.कदाचित ही ट्रिक काही जणांना माहीत असेल .तरीपण आपण सर्वांना ही ट्रिक शेअर करूया.
विचारलेल्या प्रश्नामध्ये सरासरी काढण्यासाठी क्रमवार नैसर्गिक संख्या किंवा सम संख्या किंवा विषम संख्या दिल्या असतील तर अशा वेळी त्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने प्रथम मांडणी करून घ्या.आणि मांडणी केल्यानंतर जी संख्या बरोबर मध्यभागी येईल ती संख्या म्हणजे त्या संख्यांची सरासरी होय.लक्षात ठेवा दिलेल्या संख्या क्रमवार असेल तरच ही ट्रिक लागू होईल अन्यथा सरासरी काढण्यासाठी आपली नेहमीचीच पद्धत वापरावी.खालील उदाहरणे अभ्यासा......
प्रश्न: 41,45,44,42,43 यांची सरासरी किती ?
उत्तर :41,42,43,44,45 (चढत्या क्रमाने मांडणी करून घ्यावी.)
मध्यभागी येणारी संख्या 43 आहे.
41,45,44,42,43 यांची सरासरी 43 आहे.
प्रश्न: 24,28,32,30,26 यांची सरासरी किती ?
उत्तर :24,26,28,30,32 (चढत्या क्रमाने मांडणी करून घ्यावी.)
मध्यभागी येणारी संख्या 28 आहे.
24,28,32,30,26 यांची सरासरी 28 आहे.
प्रश्न: 55,59,51,53,57 यांची सरासरी किती ?
उत्तर :51,53,55,57,59 (चढत्या क्रमाने मांडणी करून घ्यावी.)
मध्यभागी येणारी संख्या 55 आहे.
55,59,51,53,57 यांची सरासरी 55 आहे.
आहे की नाही सोपी पद्धत अगदी सेकंदात उत्तर येईल.
टीप: लक्षात ठेवा दिलेल्या संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या किंवा सम संख्या किंवा विषम संख्या असेल तरच ही ट्रिक लागू होईल अन्यथा सरासरी काढण्यासाठी आपली नेहमीचीच पद्धत वापरावी..
0 Comments