International Gk Trick
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यार्या सर्व विद्यार्थ्यांचे abhyaskatta.com वर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला माहीतच आहे की अभ्यासाला असणारे खूप सारे विषय यामुळे अभ्यासाचा आवाका वाढलेला असतो. आणि मग अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी आपण विविध टेकनिक, ट्रिक्स वापरतो. त्यामुळे बर्याचशा किचकट संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच प्रकारची सामान्य ज्ञानाची (General Knowledge) एक ट्रिक सांगणार आहे.
जनरल नॉलेजचा अभ्यास करतांना आपल्याला विविध जागतिक संघटनाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. त्या संघटनेचे स्थापना वर्ष कोणते ? मुख्यालय कोठे आहे ? अशा विविध प्रकारचे प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. मग ते लक्षात ठेवताना आपला गोंधळ उडतो. अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी सांगितलेली ट्रिक जर तुम्ही वापरली तर अगदी सेंकदात तुम्ही उत्तर देऊ शकता. काही जागतिक संघटनांची मुख्यालये लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील ट्रिक अभ्यासा. त्यासाठी खालील गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टीमध्येच ती ट्रिक दडलेली आहे.
ज्या देशाचे हवामान चांगले, तर तेथील लोकांचे आरोग्य चांगले, आरोग्य चांगले तर त्यांच्या शरीरातील रक्त सुद्धा लाल(Red) गडद रंगाचे, त्यामुळे तेथील कामगार सुद्धा चांगले, कामगार चांगले तर तेथील व्यापार सुद्धा चांगला.
वरील गोष्टीमधील बोल्ड अक्षरात लिहिलेले शब्द महत्वाचे आहे. या शब्दावरून आपण संघटनांची नावे लक्षात ठेवणार आहोत. हवामान - जागतिक हवामान संघटना, आरोग्य - जागतिक आरोग्य संघटना, Red - जागतिक रेडक्रॉस संघटना, कामगार - जागतिक कामगार संघटना, व्यापार - जागतिक व्यापार संघटना. मग आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये ट्रिक काय आहे ? तर विद्यार्थी मित्रांनो वर दिलेल्या सर्व संघटनांचे मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा या ठिकाणी आहे. आहे कि नाही सोपी ट्रिक अगदी सेंकदात तुमच्या लक्षात राहील. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अभ्यासाच्या ट्रिक www.abhyaskatta.com वर येणार आहेत.
जागतिक संघटना
संघटनेचे नाव | मुख्यालय |
---|---|
जागतिक हवामान संघटना | जिनेव्हा |
जागतिक आरोग्य संघटना | जिनेव्हा |
जागतिक रेडक्रॉस संघटना | जिनेव्हा |
जागतिक कामगार संघटना | जिनेव्हा |
जागतिक व्यापार संघटना | जिनेव्हा |
0 Comments