New update

6/recent/ticker-posts

तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम talathi syllabus in marathi pdf download

 
Talathi syllabus in Marathi pdf download

Talathi syllabus in Marathi pdf download

   तलाठी  : तलाठी हे महसूल विभागातील पद आहे. जमिनीसंबंधीची विविध कागदपत्रे अद्यावत ठेवण्याचे काम तलाठी करत असतो. जमिनीसंबंधी झालेल्या व्यवहाराची नोंद तलाठी घेत असतो. सातबारा, आठ अ  यासंबंधी झालेल्या नोंदी तलाठी अद्यावत करतो. तलाठ्याची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाते. जमीन व्यवहाराच्या नोंदी बरोबरच गावातील नैसर्गिक आपत्तीची माहिती वरिष्ठांना देण्याची जबाबदारी तलाठ्याची असते. 
                      
पात्रता :  महाराष्ट्रामध्ये तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षा मार्फत केली जाते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
( कृपया जाहिरातीत नमूद केलेली पात्रता अभ्यासावी. कारण यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो )


तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम Talathi syllabus in Marathi pdf download

साधारणपणे तलाठी भरती स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो.

मराठी : शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, काळ, प्रयोग , समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विराम चिन्हाचा वापर, प्रसिद्ध लेखक व  त्यांची  पुस्तके.

इंग्रजी :   Parts of speech, synonyms    antonyms, voice, punctuation,  tense, , article,  question tag,  idioms and phrases. 

बुद्धिमत्ता :  अंकगणित - बेरीज , वजाबाकी, गुणाकार ,भागाकार, सरासरी, काळ काम वेग, गुणोत्तर प्रमाण, वर्ग वर्गमूळ, घातांक, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, शेकडेवारी, नफा तोटा, सरळव्याज, मापन.
बुद्धिमत्ता- अक्षर मालिका, संख्या मालिका, समसंबंध, वेगळी आकृती ओळखा, वेगळी संख्या ओळखा, वेन आकृती, दिनदर्शिका
 

सामान्य ज्ञान : चालू घडामोडी,  इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, संगणकावर आधारित प्रश्न


(कृपया जाहिरातीत नमूद केलेला तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासावा कारण यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो.)

[ साधारणपणे वरील प्रत्येक विषयावर 25 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न तलाठी भरती परीक्षेत विचारले जातात.] 

Post a Comment

0 Comments