New update

6/recent/ticker-posts

NMMS exam information in marathi

nmms exam information in marathi

NMMS exam information in marathi


NMMS परीक्षा माहिती : NMMS चा अर्थ - National Means cum Merit Scholarship Scheme सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्याथ्यांचे उच्च माध्यमिक स्तरपर्यन्तचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी ,आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापयंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

NMMS परीक्षा माहिती ( NMMS exam information in marathi )

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाऊन करता येते.

परीक्षेसाठी पात्रता : * महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

१) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उपन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसिलदारांचा/तलाठयांचा सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षाचा उपन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उपन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

२) विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (Sc / St चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

* खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
1) विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
2) केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
3) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
4) शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
5) सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


* विद्यार्थ्यांची निवड :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्‍चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्यांची निवड करण्यात येईल.


परीक्षा स्वरूप : NMMS या परीक्षेत दोन पेपर असतील.


अ.क्र विषय एकूण गुण एकूण प्रश्न वेळ
1 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test ( MAT ) 90 90 दीड तास ( फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात येईल )
2 शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test ( SAT ) 90 90 दीड तास ( फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात येईल )

NMMS परीक्षा अभ्यासक्रम :

परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
A) बौध्दिक क्षमता चाचणी :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्‍न असतात.
B) शालेय क्षमता चाचणी :- ही सामान्यत: इयत्ता ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये
१. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५)
२. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
३. गणित (एकूण गुण - २०)
असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्‍न सोडवायचे असतात.
* उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
गणित २० गुण,

NMMS परीक्षा माध्यम :- प्रश्‍नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्‍नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्‍नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्‍नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वुर्तळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वुर्तळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

*शिष्यवृत्ती दर :-
* शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ.९ बी ते १२वी पर्यंत दरमहा रु. १०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
* शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी ब इ. ११ बी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (sc/st विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)
* इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (sc/st' विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
* सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य) व मा. शिक्षणसंचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते

Nmms exam जुन्या प्रश्नपत्रिका

Post a Comment

0 Comments