संत गाडगे बाबा यांचा परिचय - Sant Gadge Baba Information In Marathi
पूर्ण नाव | डेबुजी झिंगराजजी जानोरकर |
---|---|
जन्म | 23 फेब्रुवारी 1876 |
जन्मगाव | शेंडगाव (अमरावती जिल्हा) |
वडीलाचे नाव | झिंगराजजी |
मृत्यू | 20 डिसेंबर 1956 - वलगाव (अमरावती जिल्हा ) |
संत गाडगे बाबा यांचे विचार
संत गाडगे महाराजांचे राहणीमान अत्यंत साधे होते. अंगावर ठिगळ, गोधडी, व हातात गाडगे असा त्यांचा साधा वेश होता. म्हणूनच त्यांना गाडगे बाबा असे म्हणत. अज्ञान, अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी - परंपरा , देवधर्म या विषयी खोट्या व भ्रामक समजुती दूर करण्यासाठी संत गाडगे महाराज आयुष्यभर झटले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले. गावोगावी जाऊन ते कीर्तन करत असे. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ' हे त्यांचे अत्यंत आवडते भजन होते . कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला नैतिक मूल्ये, परोपकार व मानवतेचे धडे त्यांनी दिले. गाडगे महाराजांना जातिभेद मंजूर नव्हता.
माणसांनी एकमेकांशी प्रेमाने व सदभावनेने वागणे, एकमेकांच्या मदतीस धावून जाणे, अडल्या, नडल्यांची, रंजल्या गांजल्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वरांची सेवा करणे होय अशी त्यांची विचारसरणी होती.
संत गाडगे बाबा यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य
संत गाडगे बाबांनी 1908 ते 1956 सालापर्यंतच्या काळात अखंड महाराष्ट्रभर गोरगरिबांसाठी कार्य केले. इ. स. 1917 ला पंढरपूर येथे ' चोखामेळा धर्मशाळेचे ' निर्माण त्यांनी केले. त्यांनी अनेक अन्नछत्रे उघडली, महारोग्यांसाठी कुष्टधाम उघडलीत, गुरांसाठी गोरक्षण बांधले, अश्पृश्यांसाठी वसतिगृह , शाळा सुरू केल्या, कन्या शाळा, महिला आश्रम उघडले, पानपोया घातल्या व महाराष्ट्राला कृतार्थ केले.
संत गाडगेबाबा यांच्याविषयी इतर माहिती
* संत गाडगे महाराज यांचे गुरु संत तुकाराम महाराज होते.
* गाडगे बाबांनी ऋणमोचन येथे ' लक्ष्मीनारायनाचे ' मंदिर बांधले.
* पूर्णा नदीवरील घाटाचे निर्माण त्यांनी केले.
* संत गाडगे बाबा जातीने परीट होते व गोधडी महाराज म्हणून सुद्धा ते ओळखले जात असे.
*
0 Comments